आ.शिरसाठ यांना एमआयएम कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करीत गाडी अडविली; आमदारांचा गर्दीतून काढता पाय

Foto

औरंगाबाद: निकाल लागल्यानंतर रस्त्यावर जल्लोष  करणार्‍या एमआयएम च्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करीत शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांची गाडी अडविली. कार्यकर्त्यांमध्ये असलेले वातावरण पाहता चालकाने गर्दीतून काढता पाय घेणेच पसंत केले. 

गुरुवारी रात्री औरंगाबाद लोकसभेचे निकाल स्पष्ट होताच शहरभर एमआयएम कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष सुरू केला होता. रात्री  शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पराभूत झाल्याची खात्री होताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले व त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे पश्चीमचे आमदार संजय शिरसाठ हे देखील त्यांच्या गाडीत बसून निघाले होते. काही अंतरावर जाताच जालनारोड वर धूत हॉस्पिटलच्या काही अंतरावर जल्लोष करणार्‍या  कार्यकर्त्यांनी आमदार शिरसाठ  हे त्यांच्या गाडीत येत असल्याचे पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांची गाडी जवळ येताच कार्यकर्त्यांनी अश्लील घोषणाबाजी करीत गाडी अडविली.  व  गाडी समोर घोषणाबाजी करीत नृत्य करण्यास सुरुवात केली. शिरसाठ यांनी फक्त त्या कार्यकर्तेकडे पाहत स्मितहास्य करीत चलकाला पुढे गाडी नेण्याचा  इशारा केला. मात्र गाडी पुढे जाताच कार्यकर्त्यांनी मागे धाव घेत पुन्हा  अश्लिल घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.तेथील वातावरण पाहून चालकाने देखील गाडीचा वेग वाढवत तेथून काढता पाय घेतला. अशीच काही अवस्था मतमोजणी केंद्राकडून शहरात जाणार्‍या इतर शिवसेना पदाधिकार्‍यांची होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker